ताव्हेर्न्ये, झां बातीस्त
ताव्हेर्न्ये, झां बातीस्त : (१६०५–८९) फ्रेंच जगप्रवासी आणि जडजवाहिरांचा एक व्यापारी. त्याने फ्रान्सबाहेर सहा प्रवास केले. पौर्वात्य जगात इराण, भारत, जावा, इंडोनेशिया या देशांना त्याने भेटी दिल्या. इराणमधील बंदर आब्बास यातून निघून तो ५ मे १६६५ रोजी सुरत बंदरात आला.